सध्याला वाहन बाजारामध्ये महिंद्रा XUV 700 खूपच चालत आहे जेव्हापासून ही गाडी लॉन्च झाली तेव्हापासून ही गाडी वेटिंग पिरेड मध्ये मिळत आहे.
नवीन डिझाईन दमदार फीचर्स आणि इंटरियर्स आणि लांबच्या प्रवासासाठी सुरक्षित अशा सर्व गोष्टी तुम्हाला XUV 700 मध्ये बघायला मिळतील.
बाहेरचे दमदार डिझाईन
जर तुमच्या परिवार मध्ये जास्त फॅमिली मेंबर असतील किंवा नसतील तरी पण आपल्यासाठी ही कार एकदम चांगला ऑप्शन आहे दिसायला एकदम दमदार आणि डिझाईन पण अशी बनवलेली आहे जे बघताच समोरचा व्यक्ती तिच्या प्रेमात पडल.
समोरून एलईडी लाईट आहे दोन्ही मिरर मध्ये टन इंडिकेटर आहेत समोर ग्रील्स आहे ज्यामुळे गाडी आणखीन सुंदर दिसते.
पाठीमागे ब्रेक एलईडी लाईट आहे त्याचे समोर आणि पाठीमागे रियर पार्किंग कॅमेरा आहे गाडी लॉक अनलॉक साठी चावी आहे आणि ओपन करायचे दरवाजे हे गाडी लॉक केल्यानंतर सर्व आत मध्ये जाऊन बंद होतात आणि अनलॉक केल्यानंतर सर्व उघडतात.
- Mahindra XUV 700 लांबी 4695 MM आणि 15.4 फिट
- रुंदी 1890 MM आणि 6.2 फिट
- उंची 1755 MM आणि 5.76 फिट
- Wheelbase साईज 2750 MM आणि 9.02 फिट
- ग्राउंड क्लिअरन्स 200 MM
- डिक्की साईज 240 लिटर
- टायर साइज
- 235/65 R17
- 235/60 R18
आत मधले नवीन फीचर्स आणि हाय क्वालिटी इंटरियर
बसण्याचे सर्व प्रवाशांचे सीट हे लेदर मध्ये आहेत स्टेरिंग ही लेदर मध्ये दिली आहे समोरचा डिजिटल मीटर आहे पाठीमागे चार पार्किंग सेन्सर आहेत जे पार्किंग करण्यासाठी कामी येतात.
समोर आणि पाठीमागे रियल डिस्प्ले कॅमेरा आहे हिची समोरची म्युझिक डिस्प्ले साईज 10.25 इंच आहे.ज्याला अँड्रॉइड आणि एप्पल फोन कनेक्ट करता येतात.
7 प्रवासी बसू शकतील अशी आसन व्यवस्था आहे क्रूज कंट्रोल आहे वरती संनरूप आहे AIR कंडिशनर आहे.मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जर कनेक्टर तसेच यूएसबी कनेक्ट करू शकता अशी सुविधा आहे.
इंजिन सुरू करण्यासाठी स्टार्ट बटन आहे. बसायचे सीट हे तुम्ही आपल्या हाईटनुसार ऍडजेस्ट करू शकता तसेच फोड सुद्धा करू शकता.प्रशस्त असे आत मधले सर्व इंटेरियर आहे.
इंजिन पावर क्षमता
महिंद्रा XUV 700 हिचे इंजिन पावर 2198 CC आहे इंजिन पावर जनरेट करत 182 BHP आणि RPM 3500 ही एक SUV कार आहे ही दोन इंजिन मध्ये येते पेट्रोल आणि डिझेल.
हिचे इंजिन 4 सिलेंडर मध्ये येते XUV 700 टॉर्क जनरेट करत 450 NM आणि 1700 ते 2800 RPM हिची डिझेल टॅंक कॅपॅसिटी 60 लिटर आहे तसेच ही हायवे ला 17 पर किलोमीटर ची आवरेज देते.XUV 700 हे BS VI 2.0 कार आहे.हिला 6 गिअर आहेत.
प्रवाशांची सुरक्षा फीचर्स
- (ABS) Anti Lock Braking System:हे सिस्टम अचानक गाडीला अनियंत्रित न होऊ देता कंट्रोलमध्ये ठेवते.
- Central Locking: ड्रायव्हरच्या सीट पासी सेंट्रल लॉक बटन आहे ते दाबल्यानंतर सर्व दरवाजे लॉक होतात.
- Chid Safety Lock: चालू गाडीमध्ये लहान मुले दरवाजा ओपन करण्याची शक्यता असते त्यासाठी सेफ्टी लॉक हे दिले आहे यामुळे दरवाजा चालू गाडीमध्ये ओपन होत नाही.
- Airbag: गाडीमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 7 एअर बॅग दिले आहेत.
- (EBD) Electronic Brakeforce Distribution:हे गाडीला डीस ब्रेक सारखे जाग्यावरती कंट्रोल करते.
- Seat Belt Warning: गाडीमध्ये बसल्यानंतर सर्व प्रवाशांनी सीट लावा ह्यासाठी हा आलाराम आहे.
- Door open Alarm: बहुतेकदा बऱ्याच जणाकडनं दरवाजा ओपन राहण्याची शक्यता असते हा आलाराम वाजल्यानंतर समजते की दरवाजा ओपन आहे लावून घ्याव.
- (TPMS) Tyre Pressure Monitoring System: गाडीच्या चारी टायर मध्ये हवा सेम आहे का हे सिस्टम दाखवते समोरच्या मीटर बोर्ड मध्ये.
- (ESC) Electronic Stability Control: हे गाडीला नियंत्रित करून चालवण्यास मदत करते चारी टायरला नियंत्रणात ठेवते.
- Speed Alert: ओव्हर स्पीड अति स्पीडने गाडी चालवत असाल तर स्पीड आलाराम वाजतो आणि आपल्याला स्पीड कमी करण्यास सांगतो.
- Speed Auto Door Lock: गाडी चालू झाल्यानंतर ऑटोमॅटिक सर्व दरवाजे बंद होतात.
कलर
महिंद्रा XUV 700 मध्ये टोटल 14 कलर आहेत
1) काळा कलर
2) पांढरा कलर
3) लाल कलर
4) निळा कलर
5) निळा काळा मिक्स कलर
6) सिल्वर कलर
7) लाल काळा मिक्स कलर
8) हिरवा कलर
9) पांढरा काळा मिक्स कलर
10) सिल्वर काळा मिक्स कलर
11) भगवा कलर
12) चॉकलेटी कलर
13) सोनेरी कलर
14) सिल्वर व्हाईट मिक्स कलर
किंमत
महिंद्रा XUV 700 ही दोन इंजन मध्ये मिळते एक पेट्रोल आणि दुसरे म्हणजे डिझेल तसेच ही ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल मध्ये उपलब्ध आहे.
महिंद्रा XUV 700 ऑटोमॅटिक मॉडेल
1) XUV 700 AX3 5 STR AT 18 लाख 59 हजार
2) XUV 700 AX5 7 STR AT 18 लाख 99 हजार
3) XUV 700 AX5 STR AT 19 लाख 89 हजार
4) XUV 700 AX7 STR AT 19 लाख 99 हजार
5) XUV 700 AX5 7 STR AT 21 लाख 59 हजार
6) XUV 700 AX7 6 STR AT 21 लाख 79 हजार
7) XUV 700 AX7 7STR AT AWD 22 लाख 79 हजार
8) XUV 700 AX7L 7STR AT 23 लाख 99 हजार
9) XUV 700 AX7L BLAZE EDITION AT 24 लाख 14 हजार
10) XUV 700 AX7L 6STR AT 24 लाख 19 हजार
11) XUV 700 AX7L 7STR AT AWD 24 लाख 99 हजार
महिंद्रा XUV 700 गिअर (मॅन्युअल) मॉडेल
1) XUV 700 MX3 5 STR 14 लाख 59 हजार
2) XUV 700 MXE 5 STR 15 लाख 9 हजार
3) XUV 700 MX 7 STR 15 लाख 49 हजार
4) XUV 700 MXE 7 STR 15 लाख 49 हजार
5) XUV 700 AX3 5 STR 16 लाख 99 हजार
6) XUV 700 AX5 S 7STR 17 लाख 49 हजार
7) XUV 700 AX3 E 5STR 17 लाख 49 हजार
8) XUV 700 AX5 SE 7STR 17 लाख 99 हजार
9) XUV 700 AX5 5STR 18 लाख 29 हजार
10) XUV 700 AX5 7 STR 18 लाख 79 हजार
11) XUV 700 AX7 7 STR 19 लाख 99 हजार
12) XUV 700 AX7 6 STR 20 लाख 19 हजार
13) XUV 700 AX7L 7STR 22 लाख 49 हजार
14) XUV 700 AX7L 6 STR 22 लाख 69 हजार
15) XUV 700 AX7L BLAZE EDITION 22 लाख 74 हजार
डाऊन पेमेंट
- (मॉडेल) Mahindra XUV 700 AXS
- Ex शोरूम किंमत: 18 लाख 68 हजार 999 रुपये
- TCS टॅक्स: 18 हजार 690 रुपये
- RTO टॅक्स: 1 लाख 91 हजार 700 रुपये
- इन्शुरन्स: 84 हजार 411 रुपये
- Fast Tag: 300 रुपये
- टोटल कॅश प्राईज जाते: 21 लाख 68 हजार 620 रुपये
- सर्विस: 3 फ्री मिळतात
- वारंटी:3 वर्षासाठी
- डाऊन पेमेंट: 2 लाख 16 हजार 862 रुपये
- टोटल डाऊन पेमेंट लोन: 19 लाख 51 हजार 758 रुपये
- रेट ऑफ इंटरेस्ट: 9.%
- EMI हप्ता
- 2 वर्षासाठी मंथली EMI 89 हजार 165 रुपये
- 3 वर्षासाठी मंथली EMI 62 हजार 65 रुपये
- 4 वर्षासाठी मंथली EMI 48 हजार 569 रुपये
- 5 वर्षासाठी मंथली EMI 40 हजार 515 रुपये
- 6 वर्षासाठी मंथली EMI 35 हजार 181 रुपये
- 7 वर्षासाठी मंथली EMI 31 हजार 401 रुपये
निष्कर्ष
मोठी आणि प्रशस्त गाडी जर घ्यायची असेल तर तुम्ही XUV 700 ही तुमच्यासाठी बेस्ट कार आहे तिच्यामध्ये सात लोक बसू शकतात तिचे इंटरियर आणि नवीन डिझाईन हे हिला उत्कृष्ट बनवते,
याच्यामध्ये नवीन फीचर्स ऍड केले आहेत लांबचा प्रवास असो किंवा जवळचा किंवा शहरातला किंवा ग्रामीण भागातला तुम्ही कोणत्याही रस्त्याने या गाडीला चालू शकतात ही गाडी सर्व गोष्टींमध्ये पास होते त्यामुळे ही एक उत्तम आणि सुरक्षित कार आहे.
हे पण वाचा:टाटा सफारी खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का
प्रश्नन आणि उत्तर
1) xuv700 हिट की फ्लॉप?
महिंद्रा XUV 700 ही सुपरहिट कार ठरली आहे.
2) Xuv700 यशस्वी आहे का?
Mahindra Xuv700 यशस्वी कार आहे.
3) Xuv 700 ही SUV कार आहे का?
होय महिंद्रा 700 ही SUV कार आहे.
4) कोणत्या Xuv700 मॉडेलमध्ये सनरूफ आहे?
महिंद्रा XUV 700 AX5 मध्ये सनरूफ आहे.