टाटा टिगोर लॉंग ड्राईव्हसाठी चांगले आहे का 

 टाटा ने सध्या मार्केटमध्ये जोरदार अशी फीचर्स आणि डिझाईन वाल्या गाड्या आणले आहेत जे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यास सफल होत आहे.

टाटा टिगोर लॉंग ड्राईव्हसाठी चांगले आहे का 

कारण टाटा हा एक ब्रँड आहे ज्याच्या वरती पूर्ण भारतीयांचा विश्वास आहे टाटाच्या कार ह्या फीचर्स सुरक्षा मजबुती टिकाऊ आणि मायलेज ह्या सर्व गोष्टींमध्ये टाटा ब्रँड पास होतो.

आज आपण Tata tigor XZA plus (Automatic) ह्या कार बद्दल माहिती घेणार आहोत.

बाहेरची डिझाईन कसे आहे

टाटा टिगोर चा समोरचा हेड लॅम्प LED DRLS मध्ये आहे.समोर ग्रील आणि बंपर आहे त्याच्यापाशी टाटाचा लोगो आहे.15 इंची चे डायमंड कट आलाय व्हील्स जे स्टील बेस मॉडल मध्ये आहे.

वरच्या छताला शार्क अँटिना काळ्या रंगाचे रूप फिनिश पाठीमागे रियर पार्किंग कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर.इलेक्ट्रॉनिक ऍडजेस्टेबल दोन्ही आरसे त्याच्यामध्ये इंडिकेटर LED लाईट.पाठीमागे टाटाचा लाल कलरचा ब्रेक लाईट.

टाटा टिगोर लॉंग ड्राईव्हसाठी चांगले आहे का 
  • टाटा टिगोर ची लांबी 3993 MM 13.1 फिट
  • रुंदी 1677 MM 5.5  फिट 
  • उंची 1532 MM 5.03 फिट
  • व्हील बेस 2450 MM 8.04 फिट
  • ग्राउंड क्लियरन्स 170 MM
  • टायर साइज
  • 1) 175/65 R14 
  • 2) 175/60 R15

आत मधून काय खास आहे

टाटा टिगोर मध्ये 7 इंच म्युझिक टच स्क्रीन डिस्प्ले ज्याला अँड्रॉइड आणि एप्पल मोबाइल कनेक्ट करू शकतो.

तसेच USB आणि AUX आहे टच स्क्रीनला ब्लूटूथ कनेक्ट होतो पाठीमागचे सामान ठेवण्याची डिक्की 419 लिटर आहे AC ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल समोरचे स्पीड मीटर हे डिजिटल आहे त्याच्यामध्ये गाडीची पेट्रोल सीएनजी किती आहे ते दाखवत गाडी किती किलोमीटर झाली आणि गाडी आवरेज किती देते  ते सर्व  दिसते.[टाटा टिगोर लॉंग ड्राईव्हसाठी चांगले आहे का]

सर्व सीट फॅब्रिक मध्ये जे हाईट नुसार कमी जास्त करता येतात.जर तुम्ही शहरात गाडी चालवत असाल तर तिच्यासाठी सिटी मोड आणि हायवे ला चालवताना इको मोड ज्यामुळे गाडीच्या इंजन मध्ये बचत होते.

टाटा टिगोर लॉंग ड्राईव्हसाठी चांगले आहे का 

गाडी सुरू झाल्यानंतर सर्व दरवाजे आटोमॅटिक लॉक होतात त्याला सेंट्रल लॉकिंग म्हणतात.चारी दरवाज्याच्या काचा खाली वरती करण्यासाठी पावर विंडोज.सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट.

इंजन पावर किती आहे

टाटा टिगोर हे 1.2 लिटर 4 सिलेंडर इंजिन आहे जे पेट्रोल आणि CNG मध्ये येते.

Petrol इंजन

पेट्रोल इंजन पावर 86 PS आहे आणि RPM 6000 आहे.इंजिन Torque जनरेट करत 113 NM आणि 3300 RPM.टिगोर पेट्रोल टाकी कॅपॅसिटी 35 लिटर आहे पेट्रोल आवरेज 17 ते 21 पर किलोमीटर आहे.

CNG इंजन

CNG इंजन पावर 73.4 PS आहे आणि RPM 6000 आहे.इंजिन Torque जनरेट करत 95 NM आणि 3500 RPM.टिगोर CNG टाकी कॅपॅसिटी 70 लिटर आहे CNG आवरेज 26 ते 28 पर किलोमीटर आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुविधा काय आहेत 

  • 4 Star NCAP rating – टाटा टिगोरला ग्लोबल NCAP रेटिंग हे 4 स्टार आहे जे सुरक्षेच्या दृष्टीने चांगले आहे.
  • Airbag- गाडीमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून 6 एअरबॅग दिले आहेत. 
  • Anti lock braking system – ABS आणि EBD हे फीचर्स गाडीला जाग्यावरती ब्रेक मारल्यानंतर नियंत्रित करते.
  • Corner stability control CSC – हे पिक्चर्स गाडीच्या आत मधून आणि बाहेरून चाकाला नियंत्रित करते.
  • ISOFIX child seat anchorages – चाइल्ड सीट अँकरजेस सेफ्टी पिक्चर्स.
  • Rear parking  sensors – गाडी रिव्हर्स पार्किंग करताना हे सेंसर गाडी पार्किंग ला मदत करत.
  • Reverse parking camera – रिव्हर्स पार्किंग कॅमेरा समोरच्या म्युझिक डिस्प्ले मध्ये मागची पूर्ण दिशा दाखवतो.
  • Over speed warning – जर तुम्ही गाडी 120 पेक्षा जास्त स्पीडने चालवत असाल तर हा आलाराम आपल्याला  स्पीड कमी करण्यास सांगतो.
  • Seat belt reminders – गाडीमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना सीटबेल्ट लावण्यास सांगतो.
  • आसे सर्व सुरक्षा फीचर्स टाटा टिगोर मध्ये दिले आहेत

टिगोर कलर पसंत

टाटा टिगोर मध्ये 5 कलर आहेत

  • पांढरा कलर
  • मेहंदी कलर
  • लाल कलर
  • जांभळा कलर
  • ग्रे कलर

टाटा टिगोर किंमत

टाटा टिगोर खरेदी करण्यासाठी कंपनीकडून 11 मॉडेल दिले आहेत जे पेट्रोल आणि CNG मध्ये उपलब्ध आहेत.

ज्या लोकांना गिअरची गाडी जमत नाही अशा लोकांसाठी कंपनीने ऑटोमॅटिक कार हे ऑप्शन दिल आहे जे CNG आणि पेट्रोलमध्ये उपलब्ध आहे.आणि त्याची किमती खालील प्रमाणे आहे.

पेट्रोल Tigor

1) Tata tigor XE 7 लाख 51 हजार रुपये

2) Tata tigor XM 8 लाख 2 हजार रुपये

3) Tata tigor XZ 8 लाख 59 हजार रुपये 

4) Tata tigor XMA (Automatic) 8 लाख 71 हजार रुपये 

5) Tata tigor XZ plus 9 लाख 40 हजार रुपये 

6) Tata tigor XZA plus (Automatic) 10 लाख 12 हजार रुपये

CNG Tigor

7) Tata tigor XM iCNG 8 लाख 80 हजार रुपये

8) Tata tigor iCNG 9 लाख 37 हजार रुपये 

9) Tata tigor XZA iCNG (Automatic) 10 लाख 5 हजार रुपये 

10) Tata tigor XZ plus iCNG 10 लाख 15 हजार रुपये 

11) Tata tigor XZA plus iCNG (Automatic) 10 लाख 82 हजार रुपये

टीप: टाटा टिगोर प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि शोरूमनुसार किंमत कमी जास्त असू शकते.

टिगोर डाऊनपेमेंट लोन

आज आपण Tata tigor XE ह्या मॉडेल बद्दल डाऊन पेमेंटची माहिती घेणार आहोत.

मॉडेल: Tata tigor XE

EX-शोरूम किंमत: 6लाख 29 हजार 900 रुपये

रजिस्ट्रेशन चार्ज: 52हजार 492 रुपये 

इन्शुरन्स किंमत: 34हजार 927 रुपये

FAST Tag चार्ज: 2100 रुपये

On Road किंमत: 7 लाख 19 हजार 419 रुपये.ते 7 लाख 40 हजार 500 रुपये. 

डाऊन पेमेंट: 1 लाख 99 हजार रुपये

Loan Amount: 5 लाख 20 हजार 419 रुपये 

Interest रेट: 9% 

5 वर्षासाठी लोन: 10 हजार 803 रुपये मंथली EMI हप्ता

6 वर्षासाठी लोन: 9 हजार 380 रुपये मंथली EMI हप्ता

7 वर्षासाठी लोन: 8 हजार 373 रुपये मंथली EMI हप्ता

हे पण वाचा:Tata nexon ही चांगली कार आहे का

निष्कर्ष

टाटा टिगोर ही स्टायलिश डिझाईन इंजन पावर उत्तम फीचर्स म्हणून ओळखली जाते ही कार तुम्हाला दोन वेरियंट मध्ये येते एक म्हणजे Petrol आणि दुसरे म्हणजे CNG.

तसेच ज्या लोकांना मॅन्युअल गाडी हवे त्यांच्यासाठी मॅन्युअल आणि ज्या लोकांना गिअरची गाडी चालवता येत नाही अशा लोकांसाठी ऑटोमॅटिक कार  उपलब्ध आहे

तिचे खास इंटेरियर पाठीमागची डिक्की म्युझिक डिस्प्ले साऊंड सिस्टिम समोरच्या टच स्क्रीन डिस्प्ले जे कारला आणखीन स्मार्ट बनवतात.

रियल पार्किंग कॅमेरा रिव्हर्स पार्किंग सेन्सर ABS EBD सिस्टीम या सर्व गोष्टी टाटा टिगोर मध्ये दिले आहे त्यामुळे Tata tigor हे आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली आहे  ही एक खास सबकॉम्पॅक्ट सिडान कार आहे.

FAQ प्रशन आणि उत्तर

1)टाटा टिगोर ही सेडान कार आहे का?

होय टाटा टिगोर हे सेडान कार आहे पण सबकॉम्पॅक्ट सेडान कार आहे.तसेच ही कार हॅचबॅक वर आधारित बनवली आहे.

2)टाटा टिगोर ही ऑटोमॅटिक कार आहे का?

टाटा टिगोर ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल हे दोन्ही मध्ये उपलब्ध आहे.1)Tata tigor XZA plus (Automatic).2)Tata tigor XMA (Automatic).3)Tata tigor XZA iCNG (Automatic).4)Tata tigor XZA plus iCNG (Automatic) हे टाटा टिगोर ची ऑटोमॅटिक मॉडेल आहेत.

3)टाटा टिगोरकडे सनरूफ आहे का?

टाटा टिगोर मध्ये सध्या तरी कोणत्याही मॉडेलमध्ये संनरुफ उपलब्ध नाही भविष्यात कंपनी त्याच्यावरती विचार करू शकते.

4)टाटा टिगोर मध्ये किती मॉडेल्स आहेत?

टाटा टिगोर मध्ये 11 मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्याच्यात 6 पेट्रोल आणि 5 CNG आहेत.तसेच 4 ऑटोमॅटिक  आणि 7 गिअर मध्ये आहेत.

5)टाटा टिगोर मध्ये किती जागा आहेत?

टाटा टिगोर मध्ये तुम्ही 5 लोक बसू शकतात समोर 2 आणि पाठीमागे 3

6)टाटा टिगोर एक यशस्वी कार आहे का?

टाटा टिगोर ही सर्वाधिक जास्त विकल्या जाणाऱ्या स्वीडन कार पैकी एक आहे टिगोर यशस्वी कार असल्यामुळे लोक तिला खरेदी करतात.

Leave a Comment