सुझुकी विटारा ऑटोमॅटिक विश्वासनीय आहे का

ग्रँड विटारा ZETA ऑटोमॅटिक  मॉडेल बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत ग्रँड विटारा जेटा ही मारुतीची SUV कार आहे.

विटारा मध्ये नवीन तंत्रज्ञांचा वापर करून कम्पलेट फीचर दिले आहेत. आणि मायलेज खूप चांगले आहे.

सर्व बाजूंनी विटारा एक SUV उत्कृष्ट कार आहे तिच्याबद्दल आज आपण पूर्ण माहिती बघणार आहोत.चला तर बघूया ग्रँड विटारा बद्दल माहिती.

सुझुकी विटारा ऑटोमॅटिक विश्वासनीय आहे का

बाहेरची डिझाईन आणि सुविधा

ग्रँड विटारा कार समोरून बघितले तर खूप अट्रॅक्टिव दिसते आणि त्याच्या समोरची  बाजू पियानो ब्लॅक सोबत ग्रील सिल्वर क्रोम आहे हे गाडीचा आणखी लुक वाढवत जे समोरच्या बंपर वरती आहे.

तसेच समोरचा लाईट हा DRS मध्ये येतो जोकी LED मध्ये आहे. त्याच LED लाईट मध्ये टर्न येलो इंडिकेटर आहे.

त्याच्याच खाली प्रोजेक्ट हेडलाईट आहे जोकी फॉग लाईट म्हणून पण समजला जातो.

आता आपण कार च्या बाजूने बघूया कार ची लांबी 4345 MM आहे  रुंदी 1795 MM आहे.आणि उंची 1645 MM आहे.

टायर साइज 2600आहे.टायर हे डायमंड कट सोबत येते समोरच्या टायरला दोन्ही बाजूंनी डीस ब्रेक आहे आणि पाठीमागच्या टायरला ही दोन्ही बाजूने डीस ब्रेक आहे.

4 टायरला डीस ब्रेक आहेत.जे की आपोलो कंपनीचे टायर आहे.टायर साइज 215/60 R 17 आहे.

गाडीचे दोन्ही बाजूचे आरसे ऑटोमॅटिक ऍडजेस्ट करू शकतो.

तसेच मिररच्या खाली म्हणजे आरशाच्या खाली टन इंडिकेटर दिले आहे जेव्हा आपण गाडी वळतो तेव्हा मिरर मध्ये सुद्धा त्याचे इंडिकेटर लागतात.

आपण कार चा दरवाजा उघडतो त्याच्या वरती एक सिल्वर कलरची लांब पट्टी आहे ही गाडीला आणखीन सुंदर दिसण्यास मदत करते.

ग्रँड विटारा ची पेट्रोल टाकी 45 लिटर मध्ये येते विटाराचा ग्राउंड क्लिअरन्स 210 मीटर मध्ये आहे जे की जबरदस्त आहे.

जेणेकरून गाडी कुठेही रोड ब्रेकर ला किंवा खड्ड्यातून जाताना खाली घासणार नाही याच्यासाठी ग्राउंड क्लिअरन्स हा खूप महत्त्वाचा असतं जो की चांगला आहे.

आता आपण गाडीची पाठीमागची बाजू बघूया पाठीमागचा लुक हा खूपसुंदर आहे जसा समोरचा आहे तसाच पाठीमागचा आहे.

पाठीमागचा जो लाईट आहे तो कनेक्ट मध्ये आहे जो LED मध्ये येतो.जेव्हा आपण रात्री लाईट लावतो तेव्हा वेगळा लाईटचा ग्लो दिसतो जो दिसण्यास आकर्षित करतो.

त्याच्याखाली SMART HYBRID टेक्नॉलॉजीचा बिल्ला आहे.मागच्या काचेला वायपर दिला आहे जसे समोरच्या काचेला आहे.

त्या वायपर वरती टपाला एक SHARK ANTINA आहे जो गाडीचा लुक खास दिसण्यास मदत करतो.

सुझुकी विटारा ऑटोमॅटिक विश्वासनीय आहे का

विटाराच्या मागच्या नंबर प्लेटपाशी रिव्हर्स कॅमेरा आहे जो आपल्याला समोरच्या म्युझिक डिस्प्ले मध्ये मागची सर्व बाजू दिसण्यास मदत करेल ज्याचा वापर आपण गाडी पार्क करण्यासाठी  करू शकतो.

त्यासोबत आणखी 4 पार्किंग सेन्सर दिले आहेत जे पाठीमागे बंपर च्या वरती आहे.मागचे बंपर हे सिल्वर कलर मध्ये आहे जे खूप अट्रॅक्टिव दिसत आहे.

ओव्हर ऑल आपण बाहेरच्या सर्व बाजूनी ग्रँड विटारा बघितल आहे.

हे पण वाचा=मारुती सुझुकी एर्टिगा चांगली कार आहे का


आतले डिझाईन आणि वैशिष्ट्ये

जेव्हा आपण ड्रायव्हिंग सीट चा दरवाजा उघडतो तेव्हा आपल्याला दरवाज्याला ब्लॅक आणि ब्राउन कलरची मिक्स फिनिशिंग दिसते जी खूपच अट्रॅक्टिव्ह आहे.

आणि दिसण्यास सुंदर आहे.जे सॉफ्ट आणि लेदर मटेरियल वापरले आहे  ब्राऊन कलरचे ड्रायव्हर दरवाज्याला चारी दरवाजाचे ऑटो इंडो दिले आहे.

ज्यांनी आपण चारी दरवाजाला  LOCK UNLOCK कंट्रोल करू शकतो.तसेच आरसा ऍडजेस्टेबल बटन आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही आरसा ऍडजेस्ट करू शकता.

ग्रँड विटारा चे सीट फॅब्रिक मध्ये आहे दोन कॉम्बिनेशन कलर मध्ये बनवले आहे ब्लॅक आणि ब्राऊन. सीटला एअरबॅग्स आहेत.

सीट तुमच्या हाईट नुसार ऍडजेस्ट करू शकता हाईट ॲडजेबल दिला आहे.

विटारा च्या स्टेरिंगला व्हाईस कंट्रोल कॉलिंग कंट्रोल वोल्युम कंट्रोल क्रूज कंट्रोल असं सर्व सिस्टम दिला आहे.

तसेच स्टेरिंगला वायपर कंट्रोल हेडलाईट कंट्रोल हे अटॅच आहे.ग्रँड व्हिटाराची चावी KEYS LOCK UNLOCK रिमोट कंट्रोल आहे.

गाडी इंजिन बटन स्टार्ट आहे.इंजिन बटन  स्टार्टच्या खाली समोरचा लाईट कमी जास्त करायचं बटन आहे.

आता आपण पाठीमागची बाजू डिक्की बघूया डिक्की ची जागा 373 लिटर आहे.

त्याच्यामध्ये लाईट आहे 12W MAXIM 120 चा बल्ब आऊटपुट आहे जे रात्री बॅग ठेवतानी काढतानी दिसण्यासाठी आहे.

स्टेफनी टायर हे डिक्की च्या खाली आहे. ग्रँड विटारामध्ये तुम्ही 5 व्यक्ती आरामात बसू शकता असा स्पेस जागा दिली आहे.

समोरचा मीटर हा डिजिटल डिस्प्ले आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाईम आवरेज SMART HYBRID बॅटरी पेट्रोल स्पीड डार्क पावर TRIP A TRIP B हे सर्व मीटर मध्ये बघायला मिळेल.

AC चे समोर चार होल्ड दिले आहेत तसेच त्याच्या बाजूला  पार्किंग बटन आहे. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे.

तसेच 12W चार्जिंग पॉईंट आहे त्यांनी आपण मोबाईल चार्ज करू शकतो त्याच्यात बाजूला USB  पॉईंट पण आहे त्याचा वापर आपण करू शकतो.

तिथेच फोन ठेवायला जागा आहे.ऑटोमॅटिक गेअर आहे ( P N D M) पार्किंग रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्ह आणि मॅन्युअली असा ऑटोमॅटिक गेअर सिस्टीम आहे त्याच्याच बाजूला क्रोम मध्ये हॅन्ड ब्रेक आहे

ग्रँड विटारा रंग पर्याय

ग्रँड विटारामध्ये तुम्हाला दहा कलर मिळतील  जे तुमच्या आवडीनुसार पसंत करू शकता. 

1) काळा कलर

2) पांढरा कलर

3) लाल कलर

4) जांभळा कलर

5) चॉकलेटी कलर

6) लाल काळा मिक्स कलर 

7) सिल्वर काळा मिक्स कलर

8) सिल्वर कलर

9) ग्रे  कलर 

10) पांढरा काळा मिक्स कलर


म्युझिक सिस्टीम मनोरंजन

 म्युझिक सिस्टम चा डिस्प्ले साइज 9 इंच आहे.म्युझिक सिस्टम हे डिसेंट आहे जे की खूप जास्त बास मारणारे नाहीये.

म्युझिक सिस्टम डिस्प्ले ला तुम्ही अँड्रॉइड मोबाईल कनेक्ट करू शकता.

आणि IPHONE ही कनेक्ट करू शकता दोन्हीही वायरलेस कनेक्ट करू शकता आणि म्युझिक लावू शकता.

ग्रँड विटारामध्ये SONY ES म्युझिक सिस्टीम स्पीकर दिले आहेत.


इंजन पावर आणि परफॉर्मन्स

ग्रँड विटारा हे 4  सिलेंडर इंजिन आहे.1462 CC आहे. तसेच हायब्रीड सिस्टीम 105.67 BHP 6000 RPM पावर आहे

जे की 4400 RPM  टॉर्क जनरेट करू शकत असे इंजिन आहे.ग्रँड विटारा 19 ते 27 PETROL मायलेज देऊ शकते तसेच तुम्ही ही कार लॉंग रूटला कुठेही घेऊन जाऊ  शकता  तिचा परफॉर्मस खूप चांगला आहे.


सुरक्षा सुविधा

विटारामध्ये तुम्हाला बरेच सेफ्टी फीचर्स बघायला मिळतील जे खालील प्रमाणे आहेत
ABS SYSTEM 

AIR BAG 

AUTOMATIC HEAD LAMP 

ELECTRONIC STABILITY CONTROL 

TRACTION CONTROL.PEDESTRIAN SAFETY


किंमत

ग्रँड विटारा CNG  किंमत 13 लाख ते 14 लाख 95 हजार पर्यंत आहे. तसेच  ग्रँड विटारा हायब्रीड इलेक्ट्रिकल प्लस पेट्रोल किंमत 18 लाख 35 हजार रुपये ते 20 लाख रुपया पर्यंत आहे.


 निष्कर्ष


मारुती सुझुकी ग्रंड विटारा ही भारतीय वाहन बाजारातली आत्याधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून बनवलेली एक SUV कार आहे.

तसेच तिचे डिझाईन प्रगतशील तंत्रज्ञान बसण्याची सुविधा आणि दमदार इंजिन तसेच दमदार मायलेज आणि परफॉर्मन्स अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या मारुती विटारामध्ये आपल्याला बघायला मिळतील.

विटारामध्ये ऑल फील ड्राईव्ह प्रणाली ही विविध रस्त्याने चालवण्यासाठी आपल्याला एक उपयुक्त पर्याय ठरते लांबच्या प्रवासासाठी ड्रायव्हिंग ही सुरक्षित म्हणून ठरली जाते.

ग्रँड विटारा मध्ये तुम्हाला दहा प्रकारचे रंग पसंत करण्यास मिळते. तसे ग्रँड व्हिटाराची किंमत तुम्ही घेताल तशा प्रकार नुसार कमी जास्त आसू शकते.

ज्यांना स्टायलिश SUV हवी आहे आणि दमदार फीचर्स हवे आहेत त्यांच्यासाठी ग्रँड विटारा एक उत्तम पर्याय असू शकते. 

1) ग्रँड विटारा यशस्वी आहे का?

 ग्रँड विटारा एक यशस्वी SUV कार
आहे.ही कार पेट्रोल हायब्रीड सीएनजी मध्ये उपलब्ध आहे

2) ग्रँड विटारा किती वेगवान आहे?

ग्रँड विटारा ही कार 130 किमी प्रति तास चालू शकते. त्यामुळे ग्रँड विटारा वेगवान कार आहे 

3)ग्रँड विटारा मध्ये किती गिअर्स आहेत?

ग्रँड विटारांमध्ये 6 गिअर आहेत

4)ग्रँड विटारा पूर्णपणे स्वयंचलित आहे का?

ग्रँड विटारा पूर्णपणे स्वयंचलित कार आहे जी ऑटोमॅटिक म्हणून ओळखली जाते

5)ग्रँड विटारा 3 सिलेंडर आहे की 4 सिलेंडर?

ग्रँड विटारा 4 सिलेंडर कार आहे



Leave a Comment