
भारतातील लोकप्रिय कार पैकी एक कार म्हणजे मारुती डिझायर जिचे नाव प्रत्येकाच्या आज ओठावरती आहे.
उत्तम डिझाईन जबरदस्त इंजन परफॉर्मन्स चांगले इंजन मायलेज कमी मेंटेनन्स आणि सर्वसामान्य परवडेल अशी कार म्हणजे मारुती डिझायर जी नवीन डिझाईन मध्ये आणि फीचर्स मध्ये बाजारात दाखल झाली आहे.
New Maruti Suzuki Dzire मधले इंटरियर आणि बाहेरचे डिझाईन
नवीन लॉन्च झालेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर चे बाहेरचे डिझाईन अत्यंत प्रीमियम लुक देणारे दिसत आहे.
गाडीच्या समोर जे ग्रील आहे ती गाडीला आणखीन आकर्षक बनवत तसेच रात्रीच्याला गाडी चालवताना समोरचा जो लाईट आहे ज्याला प्रोजेक्ट असे बोलले जाते त्याच्यामुळे गाडीच्या रात्रीच्या दिसणाऱ्या लाईट मध्ये आणखीन चांगली भर घालते.
पाठीमागे सुद्धा एलईडी हेड लाईट दिलाय त्यामुळे गाडी आणखीन पहिल्यापेक्षा स्टायलिश दिसते तसेच गाडीच्या वरती एक शार्क फिंग ऑंटीना दिला आहे ज्यामुळे गाडी स्टायलिश दिसून स्वतःकडे आकर्षित करते.
गाडीला 15 इंचे डायमंड कट ऑफ व्हील दिली आहेत ज्यामुळे गाडीचा लुक हा पहिल्यापेक्षा स्फोट दिसतो डिझायर मध्ये पाच प्रवासी बसून आरामात प्रवास करू शकतील अशी आरामदायी जागा आहे,
गाडीमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे ज्यामुळे एसीला आणखीन आरामदायी मध्ये भर पाडते गाणे ऐकण्यासाठी सात इंचीचा स्मार्ट स्टुडिओ इम्पोर्टेन्ट सिस्टम अँड्रॉइड आणि एप्पल आयफोन ला कनेक्ट करून तुम्ही गाणे ऐकू शकता.
आत मधली केबिन हे प्रीमियम मध्ये येते तिचे सर्व सीट हे आपल्या हाईट नुसार ऍडजेस्ट करून बसू शकता.
मारुती स्विफ्ट डिझायर ची चालू करण्याचे इंजन हे पुश बटन मुळे स्टार्ट होते तसेच तिला अधिक सोयीस्कर सोपे बनवते गाडीला ओपन करण्यासाठी ऑटोमॅटिक लॉक अनलॉक बटनची स्मार्ट चावी दिली आहे.
- मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर
- लांबी 3995 MM
- रुंदी 1695 MM
- उंची 1555 MM
- Front Tread 1430 MM
- Rear Tread 1495 MM
- Wheelbase साईज 2587 MM
- ग्राउंड क्लिअरन्स 163 MM
- डिक्की साईज 378 लिटर
- टायर साइज 165/80R14 ट्यूबलेस टायर

मारुती स्विफ्ट डिझायर मध्ये प्रवाशांची सुरक्षा
गाडीत बसलेल्या सर्व प्रवाशांचा विचार करून डिझायर मध्ये ड्रायव्हर आणि आत मध्ये बसलेल्या पॅसेंजर साठी सहा एअर बॅग दिल्या आहेत.
तसेच चालू गाडीमध्ये कोणी दरवाजा ओपन नको करण्यासाठी सेंट्रल लॉकिंग सिस्टीम आहे.
EBD हे फीचर्स डिझायर मध्ये दिले आहे जेणेकरून गाडीचे ब्रेक मारल्यानंतर गाडीच्या चारी टायरला समान प्रेशर जाऊन गाडीचे टायर लॉक न होता गाडी जागेवरती कंट्रोल होती जेणेकरून गाडीची सुरक्षा वाढते.
ABS फीचर्स यामुळे काय होते ब्रेक मारल्यावर ते गाडी चे टायर लॉक न होता व रस्त्यावरून खाली न सटकता गाडी जाग्यावर स्थिर राहते त्याच्यासाठी हे फीचर्स आहेत.
ESC हे फीचर्स जेव्हा तुम्ही मोठे घाट चढता तेव्हा गाडीचे नियंत्रण हे कंट्रोल राहिले पाहिजे तसेच गाडी स्थिर राहिली पाहिजे त्याच्यासाठी हे फीचर्स सेंसर नुसार गाडीवरती आणि गाडीचे स्टेरिंग वरती कंट्रोल ठेवते.
गाडीमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट आलाराम तसेच गाडीच्या चार टायर मध्ये समान हवा आहे का त्याच्यासाठी TPMS फीचर्स दिले गेले आहे.
बहुतेक जण गाडी हायवेला ओव्हर स्पीड चालवतात त्यासाठी स्पीड अलर्ट फीचर्स हे डिझायर मध्ये आहे इम्पॅक्ट सेंसिंग ऑटो डोर अनलॉक ह्या फीचर्स मुळे काय होते जेव्हा तुम्ही गाडी थांबवता तेव्हा ऑटोमॅटिकली सर्व दरवाजे ओपन होतात म्हणजे अनलॉक होतात.
पाठीमागे गाडी रीवास लावण्यासाठी 360° डिग्री चा कॅमेरा दिला आहे.ग्लोबल NCAP सेफ्टी रेटिंग मध्ये स्विफ्ट डिझायर ला 5 स्टार रेटिंग दिला आहे.जेणेकरून खूप उत्तम आणि चांगले आहे.
स्विफ्ट डिझायर इंजन पावर
मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर इंजन हे 1197 सीसी पावरचे आहे जे इंजन पावर जनरेट करता 7643 बीएचपी आणि 6000 हजार आरपीएम तसेच हे इंजन 4 सिलेंडर मध्ये येते.
हे इंजन टॉर्क जनरेट करत 98.5 NM 4300 आरपीएम हे इंजन K12M VVT14 टाईपचे आहे.
स्विफ्ट डिझायर मॅन्युअल टाईप मध्ये येते जिला 5 गिअर आहेत.
स्विफ्ट डिझायर ही दोन ट्रान्समिशन मध्ये येते एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरे म्हणजे सीएनजी पेट्रोल ही हायवेला मायलेज देते 23.15 पर किलोमीटर तसेच सीएनजी हायवे ला मायलेज देते 31.12 पर किलोमीटर.
स्विफ्ट डिझायर कलर
1) लाल कलर
2) पांढरा कलर
3) चॉकलेटी कलर
4) सिल्वर कलर
5) ग्रे कलर
6) निळा कलर
7) काळा कलर
किंमत मारुती स्विफ्ट डिझायर
मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर ही दोन इंजिन मध्ये येते एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरे म्हणजे सीएनजी तसेच त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक आणि गिअर हे दोन ऑप्शन उपलब्ध आहेत.
मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर पेट्रोल मॉडेल
1) Dzire LXI 6 लाख 79 हजार
2) Dzire VXI 7 लाख 79 हजार
3) Dzire VXI AMT (Automatic) 8 लाख 24 हजार
4) Dzire ZXI 8 लाख 89 हजार
5) Dzire ZXI AMT (Automatic) 9 लाख 34 हजार
6) Dzire ZXI PLUS 9 लाख 69 हजार
7) Dzire ZXI PLUS AMT (Automatic)10 लाख 14 हजार
मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर CNG मॉडेल
8) Dzire VXI CNG 8 लाख 74 हजार
9) Dzire ZXI CNG 9 लाख 84 हजार
डाऊन पेमेंट मारुती स्विफ्ट डिझायर
- (मॉडेल) NEW DZIRE LXI बेस्ट मॉडल
- Ex शोरूम किंमत: 6 लाख 79 हजार रुपये
- RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 48 हजार 330 रुपये
- इन्शुरन्स चार्ज: 34 हजार 597 रुपये
- HP चार्ज:1500 रुपये
- MCD पार्किंग चार्ज: 4000 रुपये
- Fast Tag ओदर चार्जेस : 800 रुपये
- बेसिक ॲक्सेसरी किट: 20 हजार 363 रुपये
- टोटल On Road जाते: 7 लाख 88 हजार 590 रुपये
- वारंटी:3 वर्ष किंवा 1 लाख किलोमीटर
- सर्विस:3 सर्विस फ्री,
- डाऊन पेमेंट: 39 हजार 430 रुपये
- लोन: 7 लाख 49 हजार 160 रुपये
- EMI हप्ता
- 3 वर्षासाठी मंथली EMI 23 हजार 770 रुपये
- 4 वर्षासाठी मंथली EMI 18 हजार 589 रुपये
- 5 वर्षासाठी मंथली EMI 15 हजार 496 रुपये
- 6 वर्षासाठी मंथली EMI 13 हजार 448 रुपये
- 7 वर्षासाठी मंथली EMI 11 हजार 996 रुपये
हे पण वाचा: मारुती सुझुकी K10 चांगली आहे का.
विश्लेषण
मारुती सुझुकी डिजायर भारतातली एक लोकप्रिय कार पैकी सिडान कार आहे जी आपल्याला पेट्रोल आणि सीएनजी मध्ये उपलब्ध होती आता डिझेल मॉडेल हे कंपनीकडून बंद करण्यात आले आहे.
कमी किमतीमुळे तुम्हाला डिझायर मध्ये भरपूर असे फीचर्स बघायला मिळतील उत्तम इंटरनल फीचर्स डिझाईन खूप उत्तम आहे इंजन परफॉर्मन्स बाकीच्या कार पेक्षाही चांगला आहे.
इंजिनचे मायलेज ही चांगले आहे सुरक्षेचा विचार कंपनीने त्याच्यामध्ये केला आहे दिला आहे त्यामुळे सुझुकी डिजायर ही एक उत्तम आणि सर्वसामान्यांना परवडेल अशी कंपॅक्ट सिडनकार आहे.
जी तुमच्या दररोजच्या वापरासाठी खूप उत्तम कार ठरू शकते जर तुम्हाला शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये वापरण्यासाठी कोणती कार हवी असेल तर तुमच्यासाठी डिझायर हे उत्तम पर्याय आहे जे तिच्याबद्दल तुम्ही खरेदी करण्यासाठी विचार करू शकता.
प्रशन आणि उत्तर
1) डिझायर सीएनजी खरेदी करणे योग्य आहे का?
डिझायर सीएनजी खरेदी करणे एक उत्तम पर्याय ठरू शकतो कारण डिझायरला पेट्रोल पेक्षा सीएनजी ला मायलेज चांगले आहे आणि सीएनजी ही परवडेल अशा दरात आहे.
2) Dzire Tours, CNG चे मायलेज किती आहे?
डिझायर Tours CNG मायलेज 31 पर किलोमीटर आहे.
3) स्विफ्ट डिझायर सर्वोत्तम का आहे?
सर्वोत्तम डिझाईन सर्वोत्तम इंजिन आणि मायलेज पेट्रोल सीएनजी मध्ये उपलब्ध सुरक्षा तसेच कमी मेंटेनन्स कुठेही तिचे स्पार्ट उपलब्ध होतात कमी खर्च काढते त्यामुळे स्विफ्ट डिझायर सर्वोत्तम आहे.
4) नवीन मारुती डिझायर लॉन्च झाली आहे का?
होय नवीन मारुती डिझायर लॉन्च झाली आहे याची पूर्ण डिटेल्स माहिती आपल्या जवळच्या मारुती शोरूम मध्ये मिळेल.