इनोव्हा क्रिस्टा इतकी लोकप्रिय का आहे 

Toyota Innova crysta भारतीय वाहन बाजारातील सर्वात जास्त प्रतिष्ठित SUV कार म्हणून ओळखली जाते.श्रीमंत लोकांपासून ते राजकारणी लोकांपर्यंत सर्वजण ही कार जास्त वापरतात कारण ही आरामदायी प्रवासासाठी आणि सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते.तिचे डिझाईन इंटरियर फीचर्स हे प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतात त्यामुळे Innova crysta ही एक लोकप्रिय कार आहे.

Table of Contents

इनोव्हा क्रिस्टा इतकी लोकप्रिय का आहे 

इनोव्हा क्रिस्टा आत मधले आणि बाहेरचे डिझाईन इतके खास का आहे

इनोवा क्रिस्टा मध्ये बाहेरचे डिझाईन हे समोरच्या व्यक्तीला तिच्याकडे बघण्यास आकर्षित करते कारण तिचे डिझाईन ही प्रीमियम लूक देणारे आहे.समोर टोयोटा चा लोगो आहे.

पाठीमागे रियर पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स आहेत जे पार्किंग करण्यास आपल्याला मदत करते.समोर एलईडी फॉग लॅम्प लाईट आहे.दोन्ही आरशामध्ये टन इंडिकेटर एलईडी लाईट आहे.आत मधली सीट हे लेदर मध्ये बनवलेले आहेत.

गाणी ऐकण्यासाठी 8 इंच चा टच स्क्रीन् सिस्टम कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो प्ले आहे.मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग कनेक्टर. ऑटोमॅटिकली क्लायमेट कंट्रोल आहे. इनोवा क्रिस्टा मध्ये तुम्ही 7 ते 8 लोक आरामात बसू शकतात.

Toyota innova crysta लांबी रुंदी आणि उंची

  • लांबी 4735 MM आणि 15.53  FIT 
  • रुंदी 1830 MM आणि 6 FIT
  • उंची 1795 MM आणि 5.89 FIT
  • Wheelbase 2750 MM आणि 9.02 FIT
  • ग्राउंड क्लिअरन्स 176 MM
  • टायर साइज
  • 205/65 R16
  • 215/55 R17

इनोव्हा क्रिस्टा चे इंजन इतके दमदार पावरफुल का आहे

Innova crysta मध्ये 3 टाईप चे मॉडेल आहेत.

1) मॉडेल 2.8 ZX AT डीजल इंजन पावर 2755 CC आहे जे पावर प्रोडूस करतं 172 BHP 3400 RPM 360 NM आणि 1200 RPM.आणि मायलेज 12 पर किलो मीटर.

2) मॉडेल GX 2.7 पेट्रोल इंजन पावर 2694 CC आहे  पावर जनरेट करत 164 BHP 5200 RPM आणि  टॉर्क जनरेट करत 245 NM 4000 RPM आणि मायलेज 10 पर किलो मीटर.

3) मॉडेल 2.4 GX डिझेल  इंजन पावर 2393 CC आहे पावर जनरेट करत 147.51 BHP 3400 RPM आणि  टॉर्क जनरेट करत 343 NM 2800 RPM आणि मायलेज 12 पर किलो मीटर.

इनोव्हा क्रिस्टा इतकी लोकप्रिय का आहे 

लोक आरामदायी प्रवासासाठी इनोव्हा क्रिस्टा का वापरतात काय खास गोष्ट आहे इनोव्हा क्रिस्टा मध्ये

इनोवा क्रिस्टा ही एक अशी कार आहे तिचा भारतामध्ये एक वेगळाच क्रेझ आहे ही कार प्रत्येक व्यक्तीला आवडतेच कारण हिचे फीचर्स लुक डिझाईन पावरफुल इंजन आणि आरामदायी प्रवास या सर्व गोष्टींमध्ये  इनोवा क्रिस्टा एक नंबर वन कार म्हणून ओळखली जाते.

तसेच हीच्यामध्ये आडवांस टेक्नॉलॉजी वापरून सुरक्षा फीचर्स दिले आहेत.[इनोव्हा क्रिस्टा इतकी लोकप्रिय का आहे]

  • Air बॅग: गाडीत बसल्यानंतर सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी Air बॅग्स आहे.
  • ABS EBD: कधी आपण व्यवस्थित गाडी चालवताना पण अचानक कोणीतरी रस्त्यात आडवे येते तेव्हा आपल्या गाडीवरचे नियंत्रण ढासळते तेव्हा हेच ABS EBD ब्रेक सिस्टीम गाडीला जाग्यावरती स्थिर करून कंट्रोल करण्यास मदत करते.
  • Stability control: हे सुरक्षा फीचर्स गाडीला स्थिर करण्याचे काम करते.
  • Seat belt: गाडीमध्ये जेवढे प्रवासी बसले त्यांच्यासाठी सीट बेल्ट आहे.जर काही प्रवाशांकडून सीट बेल्ट नाही लावला गेला तर ते आलाराम वाजत राहतो की जेणेकरून आपण सुरक्षेसाठी सीट बेल्ट लावावा.
  • Over speed warning: काही वेळेस काय होतं अचानक आपण खूप फास्ट गाडी चालवतो ज्याला ओव्हर  स्पीड म्हणतात जे आपल्या सुरक्षेसाठी धोका उदभव शकतो त्यासाठी ओव्हर स्पीड हा आलाराम आहे जेणेकरून आपला गाडीचा स्पीड कमी करण्यासाठी सांगतो.
  • Child lock: गाडीचे सर्व दरवाजे ह्या चाइल्ड लॉक ने बंद होतात जे ड्रायव्हिंग सीट पासी आहे.तसेच गाडी दहाच्या स्पीडनी चालू झाल्यानंतरही ऑटोमॅटिक सर्व दरवाजे चाइल्ड लॉक ने बंद होतात.
  • NCAP Crash test rating: ग्लोबल सुरक्षा रेटिंग मध्ये इनोव्हा क्रिस्टा 5  स्टार मिळवले आहेत.जे सुरक्षाच्या  दृष्टीने खूप चांगले स्टार मिळाले आहेत.

इनोव्हा क्रिस्टा चे प्रकार आणि त्याची किंमत

इनोव्हा क्रिस्टा मध्ये सात प्रकार चे मॉडल आहेत जे मॅन्युअल मध्ये आहेत आणि डिझेल इंजिन मध्ये आहेत त्याची किंमत प्रत्येक मॉडेल नुसार ठरलेली आहे प्रत्येक मॉडेल ची किंमत त्याच्या फीचर्स सुविधा वरती ठरते.

1) Innova Crysta GX 7 STR 24 लाख 43 हजार रुपये 

2) Innova Crysta GX 8 STR 24 लाख 42 हजार रुपये

3) Innova Crysta GX Plus 7 STR 26 लाख 27 हजार रुपये

4) Innova Crysta GX Plus 8 STR 26 लाख 34 हजार रुपये

5) Innova Crysta VX 2.4 7 STR 30 लाख 50 हजार रुपये

6) Innova Crysta VX 2.4 8 STR 30 लाख 56 हजार रुपये

7) Innova Crysta ZX 2.4 7 STR 32 लाख 48 हजार रुपये

इनोव्हा क्रिस्टा इतकी लोकप्रिय का आहे 

इनोव्हा क्रिस्टा कलर

इनोव्हा क्रिस्टा मध्ये 5 प्रकारचे कलर आहेत.

  • काळा  कलर 
  • पांढरा कलर
  • सिल्वर मेटालिक कलर
  • प्लॅटिनियम व्हाईट कलर
  • Avant bronze मेटालिक कलर

इनोव्हा क्रिस्टा डाऊन पेमेंट

Innova crysta GX PLUS

Ex-शोरूम किंमत: 21 लाख 39 हजार रुपये 

रजिस्ट्रेशन चार्ज: 2लाख 25 हजार 900 रुपये

इन्शुरन्स: 1लाख 11 हजार 612 रुपये

Other चार्ज: 23 हजार 390 रुपये

On रोड किंमत: 24 लाख 99 हजार 902 रुपये ते 25 लाख 20 हजार 500 रुपये

1) डाऊन पेमेंट: 4 लाख 80 हजार रुपये

लोन: 20 लाख 19 हजार 902 रुपये

इंटरेस्ट रेट: 9%

5 वर्षासाठी मंथली EMI 41 हजार 929 रुपये

6 वर्षासाठी मंथली EMI 36हजार 409 रुपये

7 वर्षासाठी मंथली EMI 32 हजार 498 रुपये

2) डाऊन पेमेंट: 8 लाख 80 हजार रुपये

लोन: 16 लाख 19 हजार 902 रुपये

इंटरेस्ट रेट: 9%

5 वर्षासाठी मंथली EMI 33 हजार 626 रुपये

6 वर्षासाठी मंथली EMI 29 हजार 199 रुपये

7 वर्षासाठी मंथली EMI 26 हजार 62 रुपये

 हे पण वाचा:टाटा सफारी खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का

निष्कर्ष

Toyota innova crysta ही एक लोकप्रिय प्रीमियम MPV SUV कार आहे जी भारतीय वाहन बाजारातली टॉपची कार म्हणून ओळखली जाते कारण ही कार तिच्या डिझाईन पासून तिची इंजिन तसेच कितीही लांबचा प्रवास असू द्या ह्या कारमध्ये काहीही त्रास जाणवत नाही त्यामुळे पैशावाले लोक ही कार जास्त खरेदी करतात.

तिचे इंटरियर फीचर्स स्टायलिश आणि उत्तम क्वालिटीचे आहे तसेच सुरक्षा साठी सर्व फीचर्स दिले आहेत ह्या कारणे वाहन बाजारामध्ये आपले एक नाव बनवले आहे.

लोक ही कार तिच्या नावावर विश्वास ठेवून खरेदी करतात हिचे दमदार इंजन पावर हिला आणखीन खास बनवते त्यामुळे Toyota innova crysta भारतीय वाहन बाजारातली एक टॉपची कार म्हणून ओळखली जाते.

FAQ प्रशन आणि उत्तर

1)इनोव्हा क्रिस्टा चांगली निवड आहे का?

इनोव्हा क्रिस्टा भारतातली सगळ्यात जास्त आरामदायी प्रवास सुरक्षा इंजन पावर दिसण्यास उत्तम असं सर्व गोष्टींमध्ये इनोवा क्रिस्टा पास होते त्यामुळे आपण आपल्या परिवारासाठी तसेच स्वतःच्या दररोजच्या वापरासाठी इनोवा क्रिस्टा डोळे झाकून घेऊ शकतात.

2)इनोव्हा क्रिस्टा ही लक्झरी कार आहे का?

इनोव्हा क्रिस्टा लक्झरी कार सारखीच आहे.लांबचा प्रवास असो किंवा जवळचा ही कार प्रवासाच्या बाबतीत उत्तम कार म्हणून ओळखली जाते.हाईट सीट इंजन पावर प्रवाशांची सुरक्षा या सर्व गोष्टी तुम्हाला इनोवा क्रिस्टा मध्ये बघायला मिळतील.त्यामुळे इनोवा क्रिस्टा एक लक्झरी कार सारखीच कार आहे.

3)इनोव्हा देखभाल करणे सोपे आहे का?

इनोव्हा क्रिस्टा ची देखभाल करणे सोपे आहे कारण हीचे इंजिन चांगले असल्यामुळे ही कार जास्त इंजन काम काढत नाही आणि सर्व दर्जेदार गुणवत्तेचे पार्ट  इनोव्हा क्रिस्टामध्ये वापरले आहेत.

4)भारतात आतापर्यंत किती इनोव्हा क्रिस्टा विकल्या गेल्या?

भारतामध्ये आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त इनोवा या विकल्या गेल्या आहेत आणि त्याची विक्री दिवसान दिवस वाढतच चालली आहे.

5)श्रीमंत लोक इनोव्हा का वापरतात?

श्रीमंत लोक इनोव्हा क्रिस्टा याच्यामुळे वापरतात कारण ती एक चांगली कार आहे आणि तिच्यामध्ये जास्त लोक बसू शकतात तसेच तिचा प्रवास हा खूप सुरक्षित आणि आरामदायिक मानला जातो तिचे इंजन तिचे आत मधली इंटरियर बाहेर चे डिझाईन हे खूप उत्तमरीत्या बनवलेले असल्यामुळे प्रत्येक जणाला आवडतेच त्यामुळे श्रीमंत लोक जास्त इनोव्हा खरेदी करतात.

6)इनोव्हा क्रिस्टा इतकी लोकप्रिय का आहे?

उत्तमरीत्या बनवलेली डिझाईन इंटरियर फीचर्स आरामदायी प्रवास टिकाऊ चालविण्यास सोपी कमी मेंटेनन्स  आणि जास्त लोक बसू शकतात त्यामुळे इनोव्हा क्रिस्टा इतकी लोकप्रिय आहे.

Leave a Comment