होंडा अमेझ ही कॉम्पॅक्ट सिडान कार आहे.ह्या कारला होंडाची एक प्रीमियम कार म्हणूनही ओळखले जाते जी काही वर्षांपासून भारतीय कार बाजारामध्ये आपले नाव बनवून आहे.
ही कार सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कार मध्ये मोजली जाते.
हिचे नवीन फीचर्स इंटरियर मायलेज इंजन पावर आणि सुरक्षा फीचर्स अशा सर्व सुविधा तुम्हाला होंडा अमेझ मध्ये बघायला मिळतील.
ही कार लोकांच्या पसंतीस उतरलेली हे एक कार आहे. चला तर बघूया होंडा अमेझ Top Model VX बद्दल पूर्ण डिटेल माहिती.
बाह्य डिझाईन आधुनिक लुक
होंडा अमेझ ही टॉप मॉडेल VX हे समोरून बघितले तर एकदम जबरदस्त आणि आक्रमक लूक दिसते.
समोर होंडाचा मोठा लोगो आहे त्याच्या खाली सिल्वर कलर चे ब्लॅक ग्रील आहे.
समोरचा जो हेडलाईट लॅम्प आहे तो ऑटोमॅटिक LED प्रोजेक्टर मध्ये दिला आहे.
LED मध्येच इंडिकेटर दिले आहेत.त्याच्याच खाली FOG लॅम्प दिला आहे.
गाडीच्या खालचा ग्राउंड क्लिअरन्स 170 MM मध्ये आहे.जो गाडीच्या हाईट नुसार योग्य आहे.समोर काचेला दोन वायपर आहेत.
15 इंच डायमंड कट टायर मिळतात.त्याच्यामध्ये होंडाचा लोगो आहे.टायर साइज 175/65 R15 आहे.होंडाची चावी ही स्मार्ट लॉक मध्ये आहे.
त्याला लॉक अनलॉक असे दोन बटन आहेत ज्यांनी तुम्ही उघडू शकता आणि बंद करू शकता.[होंडा अमेझ ही लक्झरी कार आहे का]
चावीला होंडा चा लोगो आहे.इलेक्ट्रिकल आरसा आहे ज्याच्यामध्ये टन इंडिकेटर LED लाईट दिला आहे.तसेच आरसा बंद आणि ओपन करू शकता.
समोर होंडा अमेझ ला डिस ब्रेक दिली आहे आणि पाठीमागे ड्रम ब्रेक दिले आहे जे ब्रेक च काम करतात.
या कार ला 3 वर्षासाठी अनलिमिटेड वारंटी मिळते.पाठीमागचा लाल लाईट C सेफ LED लाईट मध्ये आहे.
तसेच पाठीमागे REAR PARKING कॅमेरा आहे.पाठीमागे 3 पार्किंग सेन्सर आहेत ज्याची मदत तुम्हाला गाडी पार्क करताना होते.
गाडीच्या वरती शार्क आंटीना आहे.होंडा अमेझ ची लांबी 3995 MM आहे.रुंदी 1695 MM आहे आणि उंची 1501 MMआहे.
अशा प्रकारचे बाहेरचे सर्व फीचर्स आणि डिझाईन होंडा अमेझ ला आहेत.
हे पण वाचा=स्विफ्ट 2024 मध्ये काय बदल आहेत.what changes in swift 2024
आतील डिझाईन प्रीमियम इंटरियर्स
होंडाअमेझ टॉप मॉडेल VX इंटरियर फिनिशिंग खूप जबरदस्त आहे जी आपल्याला प्रीमियम कार फीलिंग्स देते.
गाडीचे स्मार्ट चावी असल्यामुळे तुम्हाला इंजिन स्टार्ट चे बटन मिळते.
हाईट ॲडजस्टमेंट ड्रायव्हिंग सीट आहे आणि फॅब्रिक मध्ये दिले आहे.
ड्रायव्हर सीटच्या दरवाजामध्ये गाडीचे चार दरवाजे लॉक अनलॉक बटन मिळते तसेच चार दरवाजाचे काच खाली वरती करायचे ऑटो फीचर्स मिळते.
होंडा अमेझ ची डिकी साईज 420 लिटर आहे.डिक्की मध्ये एक छोटासा बल्ब लाईट दिला आहे.
म्युझिक डिस्प्ले 7 इंच आहे ज्याला तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आणि आयफोन कनेक्ट करू शकता.
समोरची स्पीड मीटर हे डिजिटल आहे त्याच्यामध्ये तुम्ही गाडीची पेट्रोल किती आहे स्पीड किती आहे गाडी किती किलोमीटर चालली गाडीमध्ये काही इमर्जन्सी प्रॉब्लेम आलाय का हे सर्व स्पीड मीटर मध्ये दिसते.
गाडीमध्ये 5 लोक आरामात बसू शकतील असा स्पेस जागा आहे.गाडीच्या स्टेरिंग ला कॉल कनेक्ट म्युझिक कनेक्ट म्युझिक चेंज करू शकता अशी सुविधा आहे.
12W मोबाईल चार्जिंग स्पोट आहे यूएसबी कनेक्टर आहे तसेच गाडीला दोनच पॅड आहेत रेस आणि ब्रेक कारण ही ऑटोमॅटिक होंडा अमेझ आहे.
इंजन पावर परफॉर्मन्स
होंडा अमेझ चा इंजिन परफॉर्मन्स जबरदस्त आहे अमेझ च इंजिन 1199 CC आहे.
होंडा अमेझ इंजिन मध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन 1.2 लिटर मध्ये येते.89 BHP पावर जनरेट करतं 110 NMH टॉर्क देत.
त्याच्यामुळे एक्सप्रेस हवेला शहरी भागातल्या ट्रॅफिक मध्ये चांगला परफॉर्मन्स भेटतो.
इंजन मध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ट्रान्समिशनचे असे दोन प्रकार बघायला मिळते जेणेकरून गाडीचा ड्रायव्हिंग परफॉर्मन्स आणि आरामदायक प्रवास आणखी वाढतो.
इंजन च्या बाबतीमध्ये बघायचे झाले तर होंडा अमेझ हे उत्तम इंजन कार आहे जी आज भारतीय वाहन बाजारामध्ये सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या कार पैकी एक आहे.
ही कार तुम्ही रोजच्या प्रवासासाठी तसेच लांबच्या प्रवासासाठी वापरू शकता हिचा प्रवास हा आरामदायी ठरतो.
सुरक्षा फीचर्स सुविधा
होंडा अमेझ मध्ये सुरक्षा साठी नवीन तंत्रज्ञांचा वापर करून भरपूर असे फीचर्स दिले आहे.
समोरच्या सीट वरती ड्रायव्हर आणि पॅसेंजर साठी SRS एअर बॅग ज्याच्यामुळे आपल्याला सुरक्षा प्रधान होत.
समोरचा जो हेड लाईट आहे ते ऑटोमॅटिक हेडलाईट कंट्रोल सेंसर मध्ये आहे.
अचानक गाडीच्या समोर जर कोणी आले तर ब्रेक मारल्यानंतर गाडीला नियंत्रित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान ABS EBD सिस्टम दिले आहे.
गाडीला रीवास पार्किंग करण्यासाठी REAR PARKING SENSOR आहे.सर्व पॅसेंजरच्या सुरक्षेसाठी सीट बेल्ट हे कंपल्सरी दिले आहेत.
जेव्हा तुम्ही अति वेगाने गाडी चालवता तेव्हा गाडीचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी HIGH SPEED ALERT आहे ज्याच्यामुळे गाडीचा आलाराम वाजतो आणि गाडीचा स्पीड कमी करा याच्यासाठी तो आलाराम आहे.
जर गाडीचे कोणत दरवाजा उघडे राहिले तर त्याच्यासाठी आलाराम आणि गाडीचा सेंट्रल आरश्या पाशी लाईट लागतो.
असे सर्व प्रकारचे सुरक्षा फीचर्स नवीन होंडा अमेझ मध्ये दिले आहेत.
रंग ऑप्शन
होंडा अमेझ मध्ये तुम्हाला सहा कलर मिळतील जे तुमच्या पसंतीनुसार निवडू शकता
1) पांढरा कलर
2) चॉकलेटी कलर
3) ग्रे कलर
4) सिल्वर कलर
5) लाल कलर
6) मेटल ग्रे कलर
किंमत
होंडा अमेझ ची किंमत प्रत्येक मॉडेल नुसार वेगळी आहे जी खालील प्रमाणे दिली आहे.
1) Honda Amaze VX Elite CVT (TOP MODEL) 11लाख 54 हजार रुपये
2) Honda Amaze VX Elite 10लाख 60 हजार रुपये
3) Honda Amaze VX CVT 11लाख 43 हजार रुपये
4) Honda Amaze S CVT 10लाख 25 हजार रुपये
5) Honda Amaze VX 10लाख 50 हजार रुपये
6) Honda Amaze S 9लाख 22 हजार रुपये
डाऊन पेमेंट सुविधा
Honda Amaze VX MODEL
EX-Showroom=8 लाख 99 हजार
Registration Fee=82 हजार 400 रुपये
Insurance Fee=35 हजार 800 रुपये
Logistic Handling Fee=5 हजार 400 रुपये
Fastag Fee=2 हजार रुपये
On Road price=10 लाख 24 हजार रुपये
Downpayment =1 लाख 50 हजार रुपये
Loan Amount = 8 लाख 73 हजार 968 रुपये
Rate of Interest= 9.40%
Time Period= 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष
5 वर्ष EMI=18 हजार 313 रुपये
6 वर्ष EMI=15 हजार 928 रुपये
7 वर्ष EMI=14 हजार 240 रुपये
निष्कर्ष
Honda Amaze ही भारतातली सर्वात लोकप्रिय कार पैकी एक आहे.जीच्याकडे एक कॉम्पॅक्ट सिडान कार म्हणून बघितले जाते.
ही कार सर्वच गोष्टी मध्ये उत्कृष्ट ठरते जसे की इंजन पावर नवीन आक्रमक डिझाईन.सुंदर इंटरियर आरामदायी प्रवासा चे सीट सुरक्षेसाठी ड्युअल बॅग दिले आहे.
गाडी चालवतानि गाडीला जाग्यावरती नियंत्रित करण्यासाठी ABS EBD ब्रेक सिस्टीम आहे.
क्लायमेट कंट्रोल आहे तंत्रज्ञान टच स्क्रीन म्युझिक डिस्प्ले आहे मल्टी फंक्शन स्टेरिंग विल अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर होंडा अमेझ मध्ये केला आहे.
जेणेकरून गाडीची सुरक्षिता विश्वासाकडे कडे घेऊन जाते.ही कार एक्सप्रेस हायवे ला तसेच शहरी भागातल्या ट्रॅफिक मध्ये चालवण्यास अत्यंत सोपी आहे.
जर आपण आपल्याला फॅमिली साठी कार घेऊ इच्छित असाल तर तुम्ही होंडा अमेझ ला पसंती देऊ शकतात कारण ही बजेटमध्ये आणि प्रीमियम अनुभव देणारी एक कंपॅक्ट सिडान कार आहे.
1)होंडा अमेझ आरामदायक आहे का?
होंडा अमेझ ही आरामदायक सिडान कार आहे.ही कार लांबच्या प्रवासाला तसेच शहरी भागात ट्राफिक मध्ये चालू शकता.ही चालवण्यास सोपी आहे.ही कार लांबच्या प्रवासासाठी तसेच जवळच्या प्रवासासाठी आपल्याला आरामदायक प्रवास प्रदान करते.
2)होंडा अमेझ ही फॅमिली कार आहे का?
होंडा अमेझ सिडान कंपॅक्ट फॅमिली कार आहे.अमेझ मध्ये तुम्ही फॅमिली सोबत लांबचा प्रवास आरामात करू शकता हिच्या मध्ये पाच व्यक्ती बसतील असा आरामदायक स्पेस जागा आहे.
3)होंडा अमेझच्या ग्राउंड क्लीयरन्सची समस्या आहे का?
होंडा अमेझ मध्ये ग्राउंड क्लिअरन्स ची समस्या बिलकुल उद्भवत नाही कारण तिच्या आकारानुसार ग्राउंड क्लिअरन्स 170 MM भरपूर आहे.अमेझ चा ग्राउंड क्लिअरन्स खराब रस्त्याच्या आबड धोबड रस्त्याला हाताळण्यास सक्षम आहे.
4)होंडा अमेझ डिझेल उपलब्ध आहे का?
होंडा अमेझ डिझेलमध्ये उपलब्ध नाही.ही कार फक्त पेट्रोलमध्ये उपलब्ध आहे.अमेझ चा पेट्रोल परफॉर्मन्स जबरदस्त आहे.
5)होंडा अमेझचे मायलेज चांगले आहे का?
होंडा अमेझ ला पेट्रोल मायलेज 18.6 आहे.जे चांगले आहे.
6)अमेझ हिल्सवर गाडी चालवू शकतो का?
अमेझ कार तुम्ही कोणत्याही हिल्सवर चालवू शकत कारण हिच इंजन पावर ही दमदार आहे जी तुम्हाला कोणत्याही चढाला हिल्सवर चालण्यास सक्षम आहे.
7)Honda Amaze कडे CNG आहे का?
होंडा अमेझ मध्ये CNG उपलब्ध नाही पण तुम्ही मार्केट मध्ये CNG डीलर्स दुकानदार शी भेटून तुम्ही होंडा अमेझ मध्ये CNG किट बसू शकता जिला एक वर्षाची गॅरंटी पण येते.