Tata altroz कमी वेळात प्रसिद्ध झालेली एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे जिचे उत्तम डिझाईन इंटरियर फीचर्स आणि आरामदायी प्रवास यामुळे लोक ईच्याकडे आकर्षित होऊन खरेदी करत आहेत.फॅमिली साठी हे एक उत्तम कार आहे तसेच रोजच्या वापरण्यासाठी उत्कृष्ट कार आहे.
आत मधले फीचर्स
प्रीमियम इंटरियर डॅशबोर्ड
इंटरियर हे अत्यंत प्रीमियम लुक देणारे आहे जे खूपच सुंदर दिसते.चांगल्या दर्जाच्या क्वालिटीचा वापर करून फिनिशिंग डॅशबोर्ड बनवले आहे.सर्व दरवाजे हे लोक आणि अनलॉक कंट्रोल करण्याची बटन हे ड्रायव्हर सीटच्या पाशी आहे.सर्व काचा कंट्रोल करण्यासाठी चारी दरवाजाला बटन दिले आहे.
टच स्क्रीन म्युझिक डिस्प्ले
गाडीत बसल्यानंतर गाणे तर हे पाहिजेतच पाहिजे त्याशिवाय गाडीमध्ये मजाच नाही त्यामुळे टाटा Altroz मध्ये 7 इंच चा म्युझिक डिस्प्ले दिला आहे जो टच स्क्रीन आहे.त्याला अँड्रॉइड मोबाईल आणि आयफोन कनेक्ट करू शकतो.म्युझिक साउंड कॉलिटी अत्यंत उत्तम आहे जेणेकरून गाणे ऐकण्यास आपल्याला भारी वाटते.
क्लायमेट कंट्रोल
Altroz मध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे ज्यामुळे आत मधलं वातावरण आणि हवा तापमान कंट्रोल ठेवते.समोर चार प्रकारचे AC वेरिएंट काढले आहेत आणि पाठीमागे दोन कारण पाठीमागच्या सीटा वरती बसलेल्या प्रवाशांना ही AC चा हवा पुरवू शकतील.
कम्फर्ट ड्रायव्हिंग सीट आणि
क्रूज कंट्रोल
आरामदायी प्रवासासाठी सीट हे खूप महत्त्वाचे असतात त्याशिवाय प्रवास पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळे Altroz मध्ये फॅब्रिक प्रीमियम सीट दिली आहेत जे आपल्याला लांबचा प्रवास करताना आरामदायी प्रवास प्रदान करतील अशा प्रकारचे सीट आणि डिझाईन आहे.
तसेच सीटला आपण आपल्या उंचीनुसार ऍडजेस्ट करून बसू शकतो ती ही सुविधा अल्ट्रास मध्ये आहे.लांबचा प्रवास करताना ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग क्रूज कंट्रोल आहे ज्याला आपण एका स्पीडनुसार सेट करून गाडी चालू शकतो.
बाहेरचे डिझाईन
टाटा अल्ट्राज मध्ये वरती रियर स्पायलर आहेत.समोर एलईडी हॅलोजन लाईट आहे.वरती ब्लॅक कलरचे सन रूप आहे तसेच समोरचे मीटर आहे डिजिटल आहे.पाठीमागे पार्किंग साठी सेन्सर्स कॅमेरा आहे.
दोन्ही साईडच्या आरशामध्ये टन इंडिकेटर आहेत जेव्हा आपण लेफ्ट किंवा राइट साईडला होतो तेव्हा त्याच्यात इंडिकेटर लागतात पिवळ्या कलरचे.पाठीमागचा लाईट हा पूर्णपणे लाल आहे समोर टाटाचा लोगो आहे जो आपल्याला ब्रँड म्हणून आकर्षित करतो.
- टाटा अल्ट्राज चि लांबी 3990 MM आहे
- रुंदी 1755 MM आहे
- उंची 1523 MM आहे
- Wheelbase साईज 2501 MM आहे.
- ग्राउंड क्लिअरन्स 165 MM
- टाटा अल्ट्राज टायर साइज
- 165 /80 R14 lower specs size
- 185/60 R16 fitted tire size
- 195/55 R16 upsized tire size
सुरक्षा सुविधा
- एअर बॅग: गाडीत बसलेल्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅक्स आहेत.
- ट्रॅक्शन कंट्रोल: हे फीचर्स गाडीला वळणाच्या ठिकाणी ऑटोमॅटिकली गती कमी करण्यास मदत करते.
- रियर कॅमेरा: ह्या फीचर्स मध्ये तुम्हाला पाठीमागच्या सर्व दिशा समोरच्या म्युझिक सिस्टीम डिस्प्ले स्क्रीन टच मध्ये दिसते.
- ऑटोमॅटिक सेन्सर ऑटो डोर लॉक: गाडी चालू झाल्यानंतर तुम्ही दरवाजा लावायचे जरी विसरलात तरी सर्व दरवाजे ऑटोमॅटिकली लॉक होतात याला आटोमॅटिक सेंसर फीचर्स म्हणतात.
- अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम: ABS हे फीचर्स गाडीला चारी टायर जाग्यावरती कंट्रोल करण्यास मदत करते त्यालाच अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम असे म्हणतात.
- सेंट्रल लॉकिंग चाइल्ड सेफ्टी लॉक: गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्या सोबत काही लहान मुले असतात ते कधी कधी चालू गाडीमध्ये दरवाजा ओपन करू शकतात त्याच्यासाठी चाइल्ड लॉक सेफ्टी फीचर्स दिले आहे जे ड्रायव्हर जवळ आहे तिथून लॉक केल्यानंतर सर्व दरवाजा ऑटोमॅटिकली बंद होऊन जातात.
- सीट बेल्ट आलाराम: काहीजण गाडीमध्ये बसल्यानंतर बिना सीट बिल लावताच प्रवास करतात अशा लोकांसाठी सेफ्टी ही खूप महत्त्वाची आहे त्यासाठी सीट बेल्ट आलाराम आहे तुम्ही सीट बेल्ट नाही लावला तर आलाराम आपल्याला सांगतो आपण सीट भेट लावून घ्यावे जेणेकरून आपला प्रवास सुरक्षित राहील.
इंजन पावर
टाटा अल्ट्रास 4 सिलेंडर इंजिन कार आहे त्यामध्ये तीन प्रकारचे इंजिन आहे डिझेल इंजन 1497 CC पेट्रोल इंजिन 1199 CC आहे आणि CNG इंजिन 1199 CC आहे.
पेट्रोल इंजिन 1199 CC पावर जनरेटर करत 87 BHP 6000 RPM टॉर्क जनरेट करत 115 NM.
डिझेल इंजिन 1497 CC आहे जे पावर जनरेट करत 89 BHP आणि टॉर्क जनरेट करता 200 Newton.
CNG इंजन 1199 CC आहे पावर जनरेटर करत 85 BHP आणि टॉर्क जनरेट करत 113 NM.
टाटा अल्ट्राज डिझेल मायलेज 23 पर किलोमीटर पेट्रोल मायलेज 19.33 पर किलोमीटर आणि CNG मायलेज 26 पर किलोमीटर आहे. CNG टॅंक कॅपॅसिटी 60 लिटर आहे.पेट्रोल टॅंक कॅपॅसिटी 37 लिटर आहे डिझेल टॅंक कॅपॅसिटी 37 लिटर आहे.
हे पण वाचा: टाटा टियागो विश्वासनीय कार आहे का
कलर
Altroz मध्ये 10 कलर आहेत
- काळा कलर
- पांढरा कलर
- लाल कलर
- सिल्वर कलर
- लाल काळा मिक्स कलर
- पांढरा काळा मिक्स कलर
- निळा कलर
- निळा काळा मिक्स कलर
- भगवा काळा मिक्स कलर
- चॉकलेटी कलर
किंमत
Tata Altroz मध्ये तीन प्रकारचे इंजन मॉडेल आहेत पेट्रोल डिझेल आणि CNG.
पेट्रोल
1) Tata Altroz XM 7 लाख 86 हजार रुपये
2) Tata Altroz XM S 8 लाख 15 हजार रुपये
3) Tata Altroz XM Plus 8 लाख 61 हजार रुपये
4) Tata Altroz XM Plus S 9 लाख 1 हजार रुपये
5) Tata Altroz XT 9 लाख 29 हजार रुपये
6) Tata Altroz XMA Plus DCT 9 लाख 75 हजार रुपये
7) Tata Altroz XZ 9 लाख 87 हजार रुपये
8) Tata Altroz XMA Plus S DCT 10 लाख 15 हजार रुपये
9) Tata Altroz XZ LUX 10 लाख 32 हजार रुपये
10) Tata Altroz XTA DCT 10 लाख 44 हजार रुपये
11) Tata Altroz XZ Plus S 10 लाख 44 हजार रुपये
12) Tata Altroz XZ Plus S Dark Edition 10 लाख 90 हजार रुपये
13) Tata Altroz XZ Plus S Lux 10 लाख 7 हजार रुपये
14) Tata Altroz XZA DCT 11 लाख 13 हजार रुपये
15) Tata Altroz XZ Plus OS 11 लाख 18 हजार रुपये
16) Tata Altroz XZ Plus S LUX Dark Edition 11 लाख 36 हजार रुपये
17) Tata Altroz XZA LUX DCT 11 लाख 58 हजार रुपये
18) Tata Altroz XZA Plus S DCT 11 लाख 60 हजार रुपये
19) Tata Altroz XZA Plus S Dark Edition DCT 12 लाख13 हजार रुपये
20) Tata Altroz XZA Plus S LUX DCT 12 लाख 43 हजार रुपये
21) Tata Altroz XZA Plus S LUX Dark Edition DCT 12 लाख 67 हजार रुपये
22) Tata Altroz XZA Plus OS DCT 12 लाख 72 हजार रुपये
डिझेल
23) Tata Altroz XM Plus 10 लाख 42 हजार रुपये
24) Tata Altroz XM Plus S 10 लाख 83 हजार रुपये
25) Tata Altroz XT 11 लाख 12 हजार रुपये
26) Tata Altroz XZ 11 लाख 71 हजार रुपये
27) Tata Altroz XZ LUX 12 लाख 40 हजार रुपये
28) Tata Altroz XZ Plus S 12 लाख 51 हजार रुपये
29) Tata Altroz XZ Plus S Dark Edition 12 लाख 98 हजार रुपये
30) Tata Altroz XZ Plus S LUX 13 लाख 16 हजार रुपये
31) Tata Altroz XZ Plus S LUX Dark Edition 13 लाख 53 हजार रुपये
CNG
32) Tata Altroz XE 8 लाख 51 हजार रुपये
33) Tata Altroz XM Plus 9 लाख 40 हजार रुपये
34) Tata Altroz XM Plus S 9 लाख 80 हजार रुपये
35) Tata Altroz XZ 10 लाख 81 हजार रुपये
36) Tata Altroz XZ LUX 11 लाख 24 हजार रुपये
37) Tata Altroz XZ Plus S 11 लाख 35 हजार रुपये
38) Tata Altroz XZ Plus S LUX 12 लाख 18 हजार रुपये
39) Tata Altroz XZ Plus OS 12 लाख 46 हजार रुपये
डाऊन पेमेंट
Tata Altroz XE (Petrol) Model
Ex-शोरूम किंमत: 6 लाख 59 हजार 900 रुपये
रजिस्ट्रेशन चार्जेस: 54 हजार 52 रुपये
इन्शुरन्स चार्ज: 34 हजार 649 रुपये
FAST Tag + Hyp चार्ज: 2 हजार रुपये
ऑन रोड किंमत: 7 लाख 50 हजार 601 रुपये
डाऊन पेमेंट: 95 हजार
लोन अमाऊंट: 6 लाख 55 हजार 601 रुपये
रेट ऑफ इंटरेस्ट: 8.65%
5 वर्ष मंथली EMI हप्ता 13 हजार 498 रुपये
6 वर्ष मंथली EMI हप्ता 11 हजार 703 रुपये
7 वर्ष मंथली EMI हप्ता 10 हजार 431 रुपये
निष्कर्ष
Altroz हे Tata ने बनवलेली एक छोटीशी फॅमिली हॅचबॅक कार आहे जी कमी वेळात जास्त पॉप्युलर झाले आहे कारण डिझाईन हे हिला एक उत्कृष्ट आणि सुंदर अशी कार म्हणून एक ओळख देते.
तसेच हिच्यामधली इंटरियर फीचर्स हे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात सेफ्टी फीचर च्या बाबतीत Altroz मध्ये भरपूर असे फीचर्स ॲड केले आहेत.लांबचा असो या जवळचा कोणताही प्रवास असू द्या ही कार तुम्हाला उत्तम आणि आरामदायी प्रवास प्रदान करते.
आत मध्ये प्रीमियर प्रकारचे इंटरियर बनवले आहे ज्यामध्ये साऊंड सिस्टिम टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे.हिच्या मध्ये टर्बो इंजिनचा वापर केला आहे.ओव्हर ऑल सगळे बघितले तर टाटा Altroz उत्तम आणि सुरक्षित कार म्हणून चांगली कार आहे.
FAQ प्रश्नन आणि उत्तर
1)Altroz डोंगराळ भागांसाठी चांगले आहे का?
Tata Altroz डोंगराळ भागासाठी उत्तम कार आहे तुम्ही कोणत्याही डोंगरामधनं Altroz चालू शकतात तिची इंजन पावर भरपूर आहे जी कोणताही डोंगर चढू शकते.
2)अल्ट्रोझ लाँग ड्राईव्हसाठी चांगले आहे का?
Altroz लांबच्या प्रवासासाठी उत्तम आणि चांगली कार आहे.तुम्ही कितीही लांबचा प्रवास Tata Altroz मध्ये बसून करू शकता.
3)Altroz खरेदी करणे योग्य आहे का?
Tata Altroz हा भारतीय ब्रँड कार आहे जो आपल्या विश्वासाला पूर्णपणे उतरतो.Altroz हे उत्तम आणि चांगली कार आहे जे भारतीय बाजारात चांगली परफॉर्मन्स करत आहे त्यामुळे आपण ही कार घेऊ शकता.
4)Altroz चांगली फॅमिली कार आहे का?
Tata Altroz ही छोटी फॅमिली कार आहे.Altroz मध्ये आपण पाच लोक बसू शकतात समोर दोन आणि पाठीमागे तीन.
5)टाटा अल्ट्रोझ ग्राउंड क्लीयरन्स समस्या आहे का?
Tata Altroz ग्राउंड क्लिअरन्स 165 MM आहे जो Altroz च्या साईज नुसार भरपूर आहे.ज्यामुळे तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्सची कोणतीही प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे.
6)Altroz आरामदायक आहे का?
Tata Altroz प्रवासासाठी आरामदायी कार आहे.जवळचा प्रवास असो या लांबचा प्रवास आपल्या फॅमिली सोबत तसेच आपण स्वतः हिच्या मध्ये प्रवास करू शकतो.जो आपल्यासाठी आरामदाय आणि उत्तम ठरतो.