XL6 मारुतीची ब्रँड कार आहे जी की दिसण्यास चालण्यास आरामदायी प्रवास अनुभव प्रदान करते.ही कार भारतीय वाहन बाजारामध्ये 2019 मध्ये लॉन्च झाली.
जी आज 2024 मध्ये पण आपली वाहन बाजारात पकड बनवून आहे.Xl6 7सीटर मध्ये येते.
कारण Xl6ही कुटुंबी यांच्या प्रीमियम अनुभवा साठी डिझाईन केलेली आहे चला तर आपण बघूया XL6 मारुती बद्दलचे विशेष माहिती.
गाडीचे आकर्षन आतून बाहेरून
XL6 ही मारुतीच्या नेक्साचाच एक प्रॉडक्ट आहे ही गाडी 7 सीटर आणि 6 सीटर मध्ये मिळते या गाडीला प्रीमियम गाडी म्हणून ओळखले जाते.
तिच्यामध्ये तुम्हाला 3 व्हेरिएंट बघायला मिळतात.1)ZETA 2)ALPHA 3)ALPHA PLUS.याच्यामध्ये तुम्हाला CNG ऑप्शन उपलब्ध आहे ते ZETA मध्ये मिळते.
तसेच तुम्हाला या कारमध्ये पाच ते सहा प्रकारचे कलरचे ऑप्शन उपलब्ध आहेत आपल्या पसंतीनुसार आपण कलर चॉईस करू शकता.
ही गाडी तुम्हाला प्रीमियम आणि लक्झरीयस अनुभव मिळवून देते.
क्रोम डोअर हँडल.एलईडी टन इंडिकेटर. डायमंड कट टायर समोर DIS ब्रेक पाठीमागे ड्रम ब्रेक.
गाडीवरती रूप रिलस मिळते ही गाडी स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी सोबत येते.
पाठीमागची बात कराल तर पाठीमागे काचेला वापर मिळते.याची चावी बटन लॉक अनलॉक आहे.
इंजिन चालू करण्यास स्टार्ट बटन आहे.असे बरेचसे फीचर्स गाडीला दिले आहेत आपण एक एक करून सर्व माहिती घेऊ.
आराम आणि सुविधा
सीट्स
सीट बात कराल तर पॉश लेदर शीट हे दिले आहे बसण्यास कम्फर्ट आहे सीट वरती बसल्यास आपल्याला AIR फील असल्यास सारखे जाणवल.
लांबच्या प्रवासाला ह्या शीट मुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही असे कम्फर्ट शीट दिले आहे.
स्पेस जागा
गाडीमध्ये 7 लोक आरामात बसू शकतात आणि लांबचा प्रवास करू शकतात तसा स्पेस जागा आत मध्ये दिली गेली आहे.
क्रूज कंट्रोल
लॉंग रूटला जाण्यासाठी आपण क्रूज कंट्रोलचा वापर करू शकता जी की आपल्याला लाँग रूटला जातानी हे क्रूज कंट्रोल एकदा स्पीड वरती लॉक केले की त्या स्पीडने गाडी आपली चालू राहते.
फक्त आपल्या स्टेरिंग पकडावी लागते बाकी गाडी ऑटोमॅटिक चालते म्हणजेच याला क्रूज कंट्रोल म्हणतात.
हे या गाडीमध्ये दिले आहे त्याच्याच बाजूला कॉलिंग साठी ब्लूटूथ हे बटन दिले आहे जे आपल्याला फोन शि कनेक्ट करता येते.
चार्जिंग पॉइंट
12V 120W मोबाईल चार्जिंग पॉइंट दिला आहे त्याच्याच बाजूला USB सॉकेट दिले आहे त्याच्याने आपण USB कनेक्ट करू शकता.
तसेच गाडीच्या मधल्या सीट म्हणजे सेंटर सीट ला सुद्धा एक चार्जिंग पॉईंट आहे
ड्रायव्हिंग सस्पेन्शन अनुभव
गाडीच्या सस्पेन्शनची बात कराल तर गाडी ही सस्पेन्शन मध्ये ती खूप चांगली आहे जी की रस्त्याने चालताना आपल्याला AIR सस्पेन्शन सारखा अनुभव प्रदान करते.
म्युझिक सिस्टीम
7 इंच स्मार्ट मल्टीमीडिया स्क्रीन टच वायरलेस अँड्रॉइड एप्पल सपोर्ट कार मध्ये दिला आहे.
सहा स्पीकर मिळतात त्याची म्युझिक सिस्टीम खूप चांगली आहे तसेच WIFI ला आपण कनेक्ट करू शकता.
LED हेड लॅम्प
गाडीच्या समोर फ्रंट साईज ला LED हॅलोजन लाईट चा एक सेटअप मिळतो जो DRS मध्ये आहे.
त्याच्या शेजारी हॅलोजन इंडिकेटर लॅम्प आहे. तोही हॅलोजन मध्ये येतो दोन्ही चा लाईट पावरफुल आहे.तसे त्याच्या खाली फॉग लॅम्प ही दिला आहे.
किंमत आणि मॉडेल
मारुती सुझुकी Xl6 मध्ये तुम्हाला 8 मॉडेल बघायला मिळतील ज्याची किंमत खालील प्रमाणे आहे.
1) Alpha Plus Dual Tone (Petrol) 15 लाख 72 हजार रुपये
2) Zeta (CNG) 14 लाख 28 हजार रुपये
3) Alpha Plus (Petrol) 15 लाख 54 हजार रुपये
4) Alpha (Petrol) 14 लाख 83 हजार रुपये
5) Zeta AT (Petrol) 15 लाख 30 हजार रुपये
6) Alpha Plus AT (Petrol) 17 लाख 18 हजार रुपये
7) Alpha AT (Petrol) 16 लाख 47 हजार रुपये
8) Alpha Plus AT Dual Tone (Top Model) (Petrol) 17 लाख 36 हजार रुपये
मारुती Xl6 कलर्स
मारुती Xl6 मध्ये तुम्हाला 9 कलर्स मिळतील जे आपल्या पसंतीनुसार चॉईस करू शकता.
1) काळा कलर
2) पांढरा कलर
3) जांभळा कलर
4) लाल कलर
5) काळा लाल मिक्स कलर
6) काळा चॉकलेटी मिक्स कलर
7) काळा सिल्वर मिक्स कलर
8) ब्राऊन कलर
9) जांभळा कलर
सुरक्षा फीचर्स
एअर बॅग्स
XL6 मध्ये सुरक्षा साठी 4 AIR BAGS दिल्या आहेत.दोन समोरच्या फ्रंट साईज ला आहेत आणि दोन सीटच्या फ्रंट साईडला आहेत अशा प्रकारे 4 AIR बॅग सुरक्षेसाठी आहेत.
ABS सिस्टीम आणि EBD
ABS( Anti- lock braking system) जेव्हा आपण गाडी चालवतो आणि अचानक ब्रेक मारतो तेव्हा आपल्या गाडीचे ब्रेक लॉक होण्याची शक्यता असते .
ABS मुळे तुम्ही अचानक ब्रेक मारली तरी गाडी लोक होत नाही.
EBD(Electronic brakeforce distribution) हे सिस्टम तुमच्या गाडीला ब्रेक मारतानी कोणत्या बाजूला किती पावर पाहिजे तेवढे पावर EBD सिस्टम मदत करत.
म्हणजेच ब्रेक मारल्यानंतर चार टायर पैकी कोणत्या टायरला जास्त ब्रेकची गरज आहे त्या गरजेनुसार त्या टायरला हे सिस्टम मदत करण्याचे काम करतात.
पार्किंग कॅमेरा
गाडीमध्ये दोन कॅमेरे दिले आहेत एक फ्रंट साईज रियल कॅमेरा आणि बॅक साइड पार्किंग कॅमेरा फ्रंट साइज रियल कॅमेऱ्याने आपल्याला समोरची बाजू सक्षम दिसू शकते.
तसेच बॅक साईड म्हणजे रिवाज गियरमुळे आपल्याला मागचं स्पष्टचित्र आपल्या LED स्क्रीन मध्ये दिसते.जेणेकरून आपण गाडी सुरक्षित पार करू शकतो.
Read More:मारुति Ignis खरेदी करणे योग्य आहे का
आवरेज आणि इंजन
ह्या कारमध्ये आपल्याला 1.50 लिटरचे 4 सिलेंडर वाला स्मार्ट हायब्रीड पेट्रोल इंजन, जे की हे इंजन 102 BHP पावर जनरेट करत.
तसेच137 NM टॉप जन नेट करण्यात हे इंजिन सक्षम आहे.ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल या दोन्ही ऑप्शन मध्ये कार उपलब्ध आहे.
जसे की गेर वाली आणि विदाऊट गेर वाली.ही कार मॅन्युअल मध्ये 5 गिअर मध्ये येते. कार BS6 सुरुवात वेरियंटमध्ये आहे.
हिला पेट्रोल मध्ये कंपनी कडून 20.27 पर किलोमीटर आवरेज दिले आहे.
किंमत
किंमत ची बात कराल तर 11 लाख 60 हजार एक्स शोरूम किंमत.आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार किंमत थोडी फार कमी जास्त ही असू शकते.XL6 मध्ये टॉप मॉडेल 13 लाखापासून सुरू आहे.
निष्कर्ष
मारुती सुझुकीच्या XL6 या कार णे भारतीय वाहन बाजारात उत्कृष्ट स्थान बनवले आहे या गाडीमध्ये सहा आणि सात सीटिंग व्यवस्था आहे.
प्रीमियर सुविधा प्रीमियर इंटेरियर स्मार्ट अशा भरपूर सुविधा ह्या गाडीमध्ये दिल्या आहेत या गाडीची इंजन क्षमता आणि इंधन बचत ही उत्तम प्रकारे आहे.
XL6 डिझाईन आणि लूक हे एक आकर्षण करते जसे की SUV MPV सारखे दिसते.स्टायलिश लुक स्टायलिश ग्रील स्मार्ट हेडलाईट आणि आरामदायी आणि उत्कृष्ट सुविधा या कार मध्ये आहेत.
त्याच्यामुळे गाडीची गुणवत्ता आणखीन वाढते कमी किमतीमध्ये भरपूर सुविधा या गाडीमध्ये दिल्या आहेत.
तुम्ही तुमच्या फॅमिली साठी या गाडीची निवड करू शकता खास करून कुटुंबासाठी लांब पल्याच्या प्रवासासाठी ही गाडी योग्य ठरेल.
XL6 खरेदी करणे योग्य आहे का?
हो नक्कीच XL6 एक तुम्ही खरेदी करू शकता सुझुकीने हे उत्कृष्ट मॉडेल नेक्सा मार्फत बाजारात आणले आहे ही कार मी मागच्या दोन वर्षांपासून वापरत आहे मला ह्या कार बद्दल खूप चांगला अनुभव आला आहे या कारचे आवरेज मेंटेनन्स आपल्याला जास्त खर्चात टाकत नाही तसेच फॅमिली साठी आणि लांब रूट साठी उत्कृष्ट अनुभव प्रदान करते.XL6 खरेदी करणे योग्य आहे.
XL6 शहरासाठी चांगले आहे का?
ही कार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागासाठी चांगली आहे ही एक फॅमिली कार आहे या कारला तुम्ही कोणत्याही रस्त्याने हायवेने चालवू शकता हिच्या सर्व गोष्टी उत्कृष्ट आहेत आपल्याला वेगळा अनुभव देऊन जातील.
XL6 चा प्रतिस्पर्ध्या कोण आहे?
मारुती सुझुकी ईरटीका ही XL6 चे सगळ्यात मोठी स्पर्धक आहे तसेच थोड्या प्रमाणात TOYOTA R UMION. KIA SELTOS. BOLERO.SCORPIO हेही थोडे स्पर्धक आहेत.
कोणते चांगले आहे.XL6 मॅन्युअल किंवा स्वयंचलित?
तसा विचार केला तर दोन्ही ही मॉडेल चांगले आहेत मॅन्युअल आणि स्वयंचलित पण मॅन्युअल मॉडेलमुळे तुम्हाला थोडं कष्ट करण्याची गरज भासते पण स्वयंचलित कार मध्ये तुम्हाला कोणतेही जास्त कष्ट घेवा लागत नाही फक्त रेस आणि ब्रेक ह्या दोनच गोष्टी करावा लागतात त्यामुळे मॅन्युअल पेक्षा स्वयंचलित कार ही थोडी चांगलीच आहे.
XL6 CNG चांगली कार आहे का?
XL6 ही कार सीएनजी मध्ये चांगली आहे तुम्हाला XL6 CNG मध्ये पर किलोमीटर 26 चे आवरेज देते.जेणेकरून आपल्या गाडीच्या आवरेजला चांगला फायदा मिळतो त्यामुळे CNG चांगली कार आहे